मुर्तिजापूर तालुका प्रतिनिधी
मुर्तिजापूर नगरपरिषद सभागृह येथे आज दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता पी एम स्वनिधि योजने अंतर्गत मुख्याधिकारी राहुल कंकाळ यांच्या मार्गदर्शनानुसार लोककल्याण मेळावा घेण्यात आला . सदर मेळाव्यात मुर्तिजापूर शहरातील पथविक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टेट बँक ऑफ इंडिया चे फील्ड ऑफिसर विवेक मिश्रा, बँक ऑफ महाराष्ट्र चे व्यवस्थापक संदेश रामटेके, सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या फील्ड ऑफिसर योगिता वानखडे , कार्यालय अधिक्षक पवन धुमाळे, शहर स्तर संघाच्या अध्यक्षा दुर्गा मोहिते, सचिव संगिता वाकोडे यांचे उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन हार अर्पण करून मेळाव्याचे उदघाटण करण्यात आले.
मेळाव्यात पथविक्रेता आत्मनिर्भरण निधी योजनेच्या पुर्नरचने बाबत माहिती योजनेचे प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल यांनी उपस्थितांना दिली.नविन अर्ज भरणे आणि पेंडिंग कर्ज प्रकरणे , ऑनलाईन पद्धतीने देवाण घेवाण व त्यावर मिळणारी कॅशबँक तसेच स्वानिधि से समृद्धी योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या आठ योजना व त्यांचे लाभ या बाबत चर्चा करण्यात आली. तसेच योजनेस २०३० पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे याचा लाभ जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी घ्यावा असे आवाहन या वेळी करण्यात आले. मेळाव्याला यशस्वी करण्या साठी समुदाय संघटिका रुबीना परवीन, विलास ठाकरे, अमोल तायडे, नितीन शिंगणे यांनी सहकार्य केले.



