मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी
मुर्तीजापुर येथून बकऱ्या चोरी करणाऱ्यांना एक दिवसा करिता पोलीस कोठडी शिक्षा मुर्तीजापुर न्यायालय यांनी दिली आहे
भोपाल या भागातून कोणाच्या सहकार्याने बकऱ्या चोरल्या जात आहे अद्यापही हा रहस्य गुलदस्त्यात दिसून येत आहे शहर पोलिसांनी आपल्या जीवाची परवा न करता सिने स्टाईलने आपली कार वेगाने चालून लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना शहरात दहशत पसरून दिलेली आहे मुर्तीजापुर येथील स्टेशन परिसरात या भागात मोठ्या प्रमाणात बकऱ्या व गाय चोरी जात आहे पोलिसांसमोर नेहमी आव्हान देणारे चोरट्यांना जेलबंद करण्यात आले भोपाल या भागातून राहणारे चार लोकांची टोळी कोणाच्या सहकार्याने मूर्तीजापुर शहरातून बकऱ्या चोरतात हे सुद्धा तपास शहर पोलीस स्टेशन च्या वतीने करण्यात येत आहे बकऱ्या चोरणारे आरोपी मोहम्मद फैजान मोहम्मद अमीन वसीम अली अख्तर अली वाजिद अली पप्पू खान या तिघांना न्यायालयात हजर केले असताना न्यायाधीश महोदय यांनी या तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणातील इरफान नामक त्यांचा साथीदार अजूनही फरार आहे पोलीस त्याचा शोध सुद्धा घेत आहे ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अशीश शिंदे नंदू टिकार मुन्ना पांडे सचिन दुबे गजानन खेडकर मंगेश विल्हेकर विनोद कुंभरे सोमनाथ फुके नामदेव आळे साजिद मेजर या सर्वांनी बकऱ्या चोरणाऱ्यांचा पाठलाग करून यशस्वी कामगिरी करून आरोपी सह पाच लाख 54000 चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल अनिल राठोड करत आहे


