मुर्तीजापुर पोलिसांनी बकऱ्या चोरांचा पाठलाग करून केले अटक
शहर पोलिसांची यशस्वी कामगिरी
मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो मुर्तीजापुर शहर पोलिसांनी बकरा चोरांना पाठलाग करून अटक केली आहे
हकीकत अशाप्रकारे आहे की सकाळी 11 वाजता उपनिरीक्षक आशिष शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्टेशन परिसरातील हनुमान मंदिर जवळ मारुती स्ट्रीम एम पी 04एच ए 1214 क्रमांकाच्या गाडीमधून चोरी करून निर्दयीपणे बकऱ्या लिखित टाकून नेत आहे अशी माहिती प्राप्त झाली या प्रकरणातील पोलिसांनी स्टेशन परिसर पासून तर नांदगाव पेठ पर्यंत आरोपीचा पाठलाग केला ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक आशिष शिंदे हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल नंदू टिकार, डीबी स्कॉट पथक मुन्ना पांडे सचिन दुबे गजानन खेडकर मंगेश विल्हेकर वाहतूक पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद कुंभरे सोमनाथ फुगे नामदेव आडे साजिद मेजर, राजेश वायध तसेच माना येथील उमेश हरमकर व पंकज वाघमारे या सर्वांनी भोपाल मधून मुर्तीजापुर येथे बकऱ्या चोरी करण्याच्या उद्देशाने आलेले आरोपीचा पाठलाग केला शहर पोलिसांनी तातडीने या प्रकरणात काही तासातच तीन आरोपी यांना अटक केली आहे व त्यांच्याकडून पाच बकऱ्या ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणात मोहम्मद फैजान मोहम्मद अमीन वय 35 वर्ष राहणार तिला जमालपुरा भोपाल, वसीअली अख्तर अली मंडीदीप जिल्हा रायसेन भोपाल वय 32, वाजिद अली पप्पू खान वय 40 वर्ष राहणार हुजूर जिल्हा भोपाल या तिघांना पोलिसांनी अटक केली एक आरोपी फरार झाला
पुढील तपास अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे
———————————- स्टेशन परिसरात राहणारे राजेश उर्फ राजू बुंदले यांचे तीन बकऱ्या सकाळी 11 वाजता पासून दिसत नव्हते तसेच जितेंद्र गोडाले यांचा सुद्धा एक बोकड्या, तर सलाउद्दीन उर्फ सल्लूभाई टांगेवाले यांची एक बकरी असे एकूण पाच बकऱ्या अकरा वाजता पासून दिसत नव्हते यांनी या प्रकरणात मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनला चोरीची फिर्याद दिली आहे
पोलिसांनी या प्रकरणात पाच बकऱ्या जप्त केले आहे
————————————



