नगर परिषदेच्या वतीने काढण्यात आली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी
मुर्तिजापूर ता. प्रतिनिधी आज दि. १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता नगर परिषद कार्यालय मुर्तिजापूर येथून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेसह पालखीतून शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५० वे) जयंती वर्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्सव साजरा करण्याबाबत नगर विकास विभाग, मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या दि. ३० जुलै २०२५ च्या परिपत्रकानुसार कळविण्यात आले होते. या अनुषंगाने मूर्तिजापूर शहरात मिरवणूक काढण्यात आली. पालखीचे नगर परिषद कार्यालय येथे मुर्तिजापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. हरिषभाऊ पिंपळे, समाजसेवक कमलाकर गावंडे यांचे हस्ते श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पालखी मार्गस्थ करण्यात आली, व मेन रोड ने पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेशन विभाग येथून श्री संत गजानन महाराज मंदिर गोयंनका नगर येथे समारोप करण्यात आला. या पालखी मिरवणुकीत अधिकारी, पदाधिकारी, मान्यवर, जुनी वस्ती येथील टाळकरी महिला दिंडी यांनी आपला सहभाग नोंदविला. सदर पालखी कार्यक्रमाचे चे नियोजन मुर्तिजापूर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांचे मार्गदर्शना खाली करण्यात आले होते. पालखी मिरवणुकीचे नियोजन पवन धुमाळे कार्यालय अधिक्षक, राजेश भुगुल सहा. प्रकल्प अधिकारी, प्रशासन अधिकारी सुभाष म्हैसने, विजय कोरडे, नरेंद्र फुरसुले, विजय लकडे, शिरीष गांधी, व सर्व नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल सरोदे, अमोल तायडे, नितीन शिंगणे, यश यावले, विलास ठाकरे, नारायण खडसे, अरविंद दिडशे यांनी सहकार्य केले.



