निवडणूक आयोगाने मुर्तीजापुर सार्वजनिक बांधकामाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी
अनेक पक्षाची मागणी
मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी
आचारसंहिता मध्ये एका मुख्यमंत्री चे आगमन प्रसंगी रस्त्याची दुरुस्ती करता येते का या संदर्भात निवडणूक आयोगाने मुर्तीजापुर सार्वजनिक बांधकाम संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी जनतेतून व्यक्त केली जात आहे
मुर्तीजापुर उड्डाणपूल पासून शिवाजीनगर पर्यंत दोन ते अडीच वर्षे आधी सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून नवीन रस्ता तयार करण्यात आला सदर रस्ता निकृष्ट असल्यामुळे वर्षभरातच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ठीक ठिकाणी खड्डे निर्माण झाले या मार्गावर स्टेट बँक तहसील कार्यालय कोर्ट पोलीस स्टेशन मार्केट सुद्धा असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून नागरिक येतात परंतु सार्वजनिक बांधकामाचे दुर्लक्षामुळे या रस्त्यावर एका वर्षापासून ठीक ठिकाणी मोठे मोठे खड्डे निर्माण झाले तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही राजकारणाच्या इशाऱ्यावर चालणारा हा सार्वजनिक बांधकाम विभाग जनतेची विषयी लापरवाही का करतो यासंदर्भात सुद्धा निवडणूक आयोगाने विशेष भूमिका घेतली पाहिजे अकोल्याचे जिल्हाधिकारी यांनी या विषयावर गंभीर त्यांनी लक्ष देऊन सार्वजनिक कामाच्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई चौकशी करून व्हावी अशी मागणी मुर्तीजापुर जनतेतून व्यक्त केली जात आहे वर्षभरापासून या रस्त्यावर अनेक वाहनधारकांना जाताना येताना तारेवरची कसरत करावी लागत होती परंतु मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आल्यामुळे त्यांनी तातडीने रस्त्यावरचे खड्डे डाग दोघी करून दुरुस्ती केले हा विषय मुर्तीजापुर मतदारसंघात गंभीर असून निवडणूक आयोगाने याआधी तक्रारीमुळे पोलीस महासंचालक यांच्यावर कारवाई करून बदली तडकाफडकी केलेली आहे हा विषय सुद्धा गंभीर असून यांना आचारसंहितांमध्ये रस्त्याची डाग दोघी एका मुख्यमंत्रीचे आगमन प्रसंगी करता येते का? याची सुद्धा सखोल चौकशी व्हावी ही अपेक्षा नागरिकाकडून व्यक्त केली जाते


