टिप्पर व लक्झरीची धडक
दोन जण जखमी


प्रतिनिधी अकोट
अकोट पोपटखेड मार्गावर भरधाव धावणाऱ्या टिप्पर व लक्झरीच्या धडकीमध्ये दोन जण गंभीर जखमी झाले. अकोट वरून धारणीकडे जाणाऱ्या लक्झरी क्रमांक एमएच १४ टीडब्ल्यू ००३४ या लक्झरी ची व टिप्पर क्रमांक एमएच ३० एल २५६१ या दोन वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या धडकीमध्ये लक्झरीचा चालक व एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाले. तसेच टिप्पर उलटल्याने सर्व रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. हा अपघात एवढा गंभीर होता की यामध्ये लक्झरीचे मोठे नुकसान झाल्याचे समजते.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



