मुर्तिजापूर ता प्रतिनिधि
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मुर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ दि २ डिसेंबर 2025 रोजी होऊ घातली असून दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे आणि आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मा. जिल्हाधीकारी वर्षा मीना आणि मा. जिल्हा पोलीस अधीक्षक.अर्चित चांडक यांचा आज रोजी मतदान पूर्व कालावधीमध्ये संवेदनशील भागांचा एकत्रित दौरा करून उपाययोजना व निवडणूक कामकाजा संबंधी पाहणी संबंधित आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती.
मा.जिल्हाधिकारी मॅडम व पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे आगमन होताच त्यांचे स्विप अंतर्गत मतदान जनजागृती अभियान मोहीम मोठ्या प्रमाणात मुर्तिजापूर शहरामध्ये राबविण्यात येत असून यामध्य १००% मतदान व्हावे या करिता विभिन्न कार्यक्रमा द्वारे मतदान जन जागृती करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आज मा. जिल्हाधिकारी महोदया व मा. पोलिस अधीक्षक यांचे हस्ते मतदार जनजागृती स्वाक्षरी अभियान मोहीमेचे स्वाक्षरी करून या मोहीमेस सुरुवात करण्यात आली . तसेच गुलाम नबी आज़ाद उर्दू हायस्कूल मूर्तिजापुर, मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू प्रथमिक शाळा मूर्तिजापुर व मुर्तिजापूर हायस्कूल मुर्तिजापूर व सेंट आन्स स्कूल यांचे विद्यार्थी यानी मतदार जनजागृति करीता पथनाटय सादर केले . स्वीप मोहीमे अंतर्गत मतदार जनजागृती प्रचार प्रसार चे हॅन्डी पोस्टर जनजागृती बॅनर हातात घेऊन पथनाट्य सादरीकरन करून १००% मतदान करण्या करिता आज मुर्तिजापूर शहरातील मतदारांना नागरीकाना आवाहन करण्यात आले . सुंदर असे सादरीकरण पाहून
२६ नोव्हेंबर २०२५ संवीधान दिनाचे औचित्य साधून निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी संविधान उद्देशीका चे वाचन केले. तसेच २६ /११/२००८ च्या मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी व निष्पाप नागरिकांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या नंतर नगरपालिका सभागृहात मा. जिल्हाधिकारी वर्षा मीना, मा. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी निवडणूक कामकाज विषयी सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी यांची आढावा सभा घेऊन कामकाजा विषयी समाधान व्यक्त केले व काही सूचना दिल्या. यावेळी जिल्हा सह आयुक्त डॉ. विश्वनाथ वडजे, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी निलेश जाधव, अतिरिक्त सहा. निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा बोबडे , उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, पोलिस निरीक्षक अजित जाधव यांची उपस्थिती होती. यानंतर मा . जिल्हाधिकारी, मा. पोलिस अधीक्षक यांनी स्ट्राँग रूम, मतमोजणी कक्ष व शहरातील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली व निवडणूक कामकाजा विषयी समाधान व्यक्त केले.


