मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो विकसित भारताचा संकल्प करणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना अमलात आणले असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत असताना
जर आमचा सरकार पुन्हा आला तर आम्ही निश्चितच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असा आश्वासन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रचार सभेत केला आहे
आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रचार सभेला देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की मुलींसाठी उच्च शिक्षणाची सोय शेतकऱ्यांसाठी कृषी पंप व त्यांना 24 तास 20 पुरवठा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहे भाजप सरकार हा शेतकऱ्यांची पाठीशी राहणारा सरकार आहे लाडकी बहिणी योजना चा लाभ सुद्धा महिलांना होत आहे. पण सावत्र भाऊ यामध्ये अडचण निर्माण करत असल्याचा टोला सुद्धा विरोधकांना देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी दिलेला आहे
भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ क्रीडा मंत्री विश्वास सारंग खासदार अनुप धोत्रे माजी आमदार गोपीकिसन बाजोरिया आमदार वसंतराव खंडेलवाल सुहासिनी ताई धोत्रे नूतन ताई पिंपळे किशोर मागटे पाटील, परिमल कांबळे वसंतराव जाधव नारायण भटकर जगदीश मारोटकर रावसाहेब कांबे सरपंच पंकज सावळे मधुकर पवार हिरासिंग राठोड सचिन देशमुख मोनाली ताई गावंडे लखन अरोरा रितेश सबाजकर भूषण कोकाटे कोमल तायडे हर्षल साबळे दीपक दांदळे रत्नपारखी ताई व इतर अनेक नेते मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते.
हरीश आमदार हरीश पिंपळे यांनी सुद्धा आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सतीश शर्मा यांनी केले जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शना ठाणेदार अजित जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता


