परमेश्वर प्राप्ती करीता संत संगत आवश्यक..मोठ्या आक्काजी
आमदार नितीन देशमुख यांची पालखी यात्रेला भेट.
आलेगाव प्रतिनिधी आजच्या कलियुगामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर भेटणे कठीण असून,परमेश्वर प्राप्ती करीता संत संगत शुद्ध आचरण आणि कठोर तपस्या आदी करीता संत संगतीमुळे,मनातील द्वेष,क्रोध,अहंकार नष्ट होतो.आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सुलभ जीवन जगण्यासाठी संत संगत असणे महत्वाचे आहे.महानुभाव पंथांचे आद्यप्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पालखी यात्रेनिमित्त येथील वाळकेश्वर देवस्थान श्री चक्रधर भक्तिधाम परिसर मध्ये आयोजित गजर श्री चक्रधर नामाचा कार्यक्रमामध्ये आलेगाव श्रीकृष्ण आश्रमाच्या संचालिका प. पू. त. रुख्मिणी ताई पंजाबी मोठ्या आक्का यांनी प्रबोधनातून भाविक भक्तांना मार्गदर्शन करीत पुढे म्हणाल्या की काम,क्रोध,द्वेष,अहंकार मानवाच्या जीवनाला अडथळे निर्माण करणारे ठरत असल्यामुळे,याचा त्याग ज्याने केला त्यांचे जीवन यथोचित बनते.आणि यासाठी संत संगत कठोर आचरण आणि नियमितता असणे गरजेचे असल्याचे सांगितले.या वेळी मंचकावर प. पू. प. म. श्री इंगोलिकर बाबा शिरसोली, प. पू. प. म. श्री आकांशबाबा बिडकर वऱ्हाडशिव भुसावळ होते.तर सूत्रसंचलन प. पू. प. म. श्री कंठीकर बाबा श्री क्षेत्र जाळीचा देव यांनी केले.प्रथम प. पू त.मोठ्या आक्काजी यांचे पूजन समस्त लाड पुजारी आणि महल्ले परिवार तर्फे विनायकराव महल्ले आदींनी शॉल श्री फळ पुष्प हार अर्पण करून केले.तसेच उपस्थित महंतांचे पूजन करण्यात आले. धर्मसभा मंडपाचे उद्घाटन प. पू. प. म. श्री इंगोलिकर बाबा शिरसोली, यांच्या हस्ते करण्यात आले होते.या वेळी श्रीकृष्ण आश्रमचे शेकडो महिला पुरुष भिक्षुका सह भाविक भक्त हजर होते.सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या विशेषाच्या मूर्तीची पालखी मध्ये वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.तसेच आमदार नितीन देशमुख यांनी पालखी यात्रेला भेट देऊन देवाचे मनोभावे दर्शन घेऊन पालखीला खांद्यावर घेऊन सोहळ्याचा आनंद घेतला.गावातील महिलांनी पालखी सोहळा मार्ग स्वच्छ करून रांगोळ्या टाकून पालखीचे स्वागत पूजन केले.या वेळी महिला आणि चिमुकल्या मुलांच्या हातामध्ये विविध सुविचारांचे स्लोगन पाट्या होत्या. मिरवणुकी नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.सदर कार्यक्रम गावकऱ्यांच्या पंचक्रोशीतील सदभक्तांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात पार पडला.



