तामसी -वाडेगाव रस्त्यावरील चित्र : ग्रामस्थांचे हाल,
किशोर अवचार
वाडेगाव : गतवर्षी तामसी ते Podcast रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झाले. अगोदरच रस्त्याचे काम थातूर माथूर केल्याने अवघ्या काही महिन्यांतच रस्त्याची दुदर्शा होऊन बऱ्याच ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी पूर्णपणे डांबर बाहेर निघून रस्त्यावरील खळी उघड्यावर पडली. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. या चार ते ५ किमी रस्त्याचे काम तत्काळ करावे, जेणेकरून या रस्त्यावरून जाणाऱ्या हजारो ग्रामस्थांना जाण्या-येण्यासाठी सोईस्कर होईल, अशी मागणी विजय पातोडे,गणेश काळे, सचिन तामसकर, आदी सह तामसी, पिंपळगाव, येथील ग्रामस्थांनी केली.
–
वाडेगाव, अकोला, माझोड येथे येण्या-जाण्यासाठी विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर मोठमोठी जाड खडी उखडून पडली आहे. या खडीवरून जाताना दुचाकी, सायकल व इतर वाहनांचे नुकसान होत असून, त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वाहनधारकांना कंबरदुखीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहने पंक्चर होण्याचे प्रकार वाढले आहेत.
वासुदेव हरिभाऊ मात्रे
ग्रामस्थ तामसी
या तामसी पिंपळगाव मार्गे वाडेगावकडे जाताना मोठी अडचण निर्माण होत आहे. या रस्त्याचे झालेल्या काम अतिशय निकृष्ट असल्याने अवघ्या काही महिन्यांतच रस्त्याची वाट लागली. परिणामी, चुरीवरून अनेकांचे अपघात झाले. संबंधित विभागाने लक्ष देऊन ही समस्या दूर करावी.
– आनंदा पातोडे- सरपंच, तामसी
अकोला-वाडेगावकरिता हा एकमेव मार्ग आहे. या रस्त्याची चाळणी झाली आहे. चार किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी मोठा विलंब होतो. त्यामुळे रुग्णाला तत्काळ उपचार घेणे शक्य होत नाही.
सिद्धार्थ पातोडे
ग्रामस्थ तामसी
रस्त्यावर चुरी झाल्याने वाहन नेताना गाडी घसरून अपघात होत आहेत. रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येईल, –
रमेश काळे ,सामजिक कार्यकर्ते तामसी



