मूर्तिजापुर ता.प्रतिनिधि – खोळद ता.मुर्तिजापुर जिल्हा अकोला दि.22 शुक्रवार सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान शंतनु अविनाश मानकर (23) रा.खोळद आपली बैल जोडी घेऊन पेढी नदीवर गेले असता वाहत्या पाण्यात वाहून गेल्याची घटना आज पहाटे घडली त्यानुसार तहसीलदार मुर्तीजापुर यांच्या सूचनेवरून शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे,नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या युवकाला शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले ,त्यानुसार बचाव पथक आपल्या साहित्या सह घटनास्थळी दाखल झाले असून बोटीच्या सहाय्याने वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेणे सुरू आहे यामध्ये सुनील कल्ले, वंदे मातरम शोध व बचाव पथक कुरणखेड,दोन दिवसांपासून शोधकार्य करीत होते, आज दु, 12.00 वा, दरम्यान वंदे मातरम शोध व बचाव पथकाचे सदस्यांना सदर मृतदेह नदीपात्रात दिसून आला,सदर मृतदेह बाहेर काढून त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला, यावेळी विशेष सहकार्य जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख संदिप साबळे,अकोलाचे सुनील कल्ले (सेवानिवृत्त तलाठी), व ,वंदेमातरम आपत्कालीन शोध व बचाव पथक कुरणखेड (काटेपुर्णा) अध्यक्ष उमेश आटोटे , राजकुमार जामनिक, नितेश मोहोड, जयकुमार दामोदर, धर्मशिल मोहोड, सचिन मोहोड , प्रदिप मोहोड , रामभाऊ दोरकर ईत्यादींनी मृतदेह शोधून काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले.


