आलेगाव येथील बस स्थानक झाले भंगार
निवाऱ्याला पुष्प हार अर्पण करून संबंधित प्रशासनाचा केला निषेध
आलेगाव दिनांक १७ प्रतिनिधी :- येथील प्रवासी निवारा गेल्या चार पाच वर्षा पासून निर्जीव अवस्थेत पडलेला असून वरील छताचे सिमेंट टीन पत्रे तुटलेले आहेत त्यामुळे,सदर प्रवासी निवारा प्रवाशांच्या अंगावर पडुन जिवीत हाणी होण्याची शक्यता बळावली आहे.आलेगावातील पत्रकार मंडळींनी तुटलेल्या निवाऱ्या बाबत अनेक वेळा विविध वृत्त पत्रामध्ये वृत्त अनेक वेळा प्रकाशित केले. परंतु संबंधित प्रशासन जागृत झाले नाही. त्यामुळे सदर निवारा पडक्या अवस्थेतच आहे.त्यामुळे आलेगावातील पत्रकार मंडळी आणि ग्रामस्थांनी दिनांक १७ रोजी पडक्या प्रवासी निवर्याला पुष्प हार अर्पण करून संबंधित प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
पातूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून आलेगावला ओळखले जाते.तसेच परिसरातील खेड्या पाड्यातील गावातील प्रवाशांची मोठी वर्दळ असते. येथून अनेक प्रवासी अकोला, खामगांव, मेहकर आदी गावाकडे ये जा करीत असतात.आणि तुटक्या प्रवासी निवाऱ्या मध्ये बसची प्रतीक्षा करीत असतात.अशा परिस्थिती मध्ये प्रवासी निवारा अंगावर पडुन जिवीत हाणी होण्याची शक्यता वाढली आहे.परंतु गेल्या काही वर्षा पासून येथील बस निवारा भग्न अवस्थेत पडलेला आहे.त्यामुळे प्रवाशांना कुठलीही व्यवस्था नाही. सद्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने प्रवाशांना कडक उन्हात बसच्या प्रतीक्षेत कुठे थांबावे हा मोठा प्रश्न प्रवाशां समोर निर्माण झाला आहे. बस निवाऱ्याची बिकट अवस्था लक्षात घेऊन येथील पत्रकारांनी वारंवार याबाबत वृत्त प्रकाशित केले.परंतु संबंधित प्रशासनाने याबाबत कुठलीही दखल घेतली नाही.तुटक्या प्रवासी निवाऱ्या कडे लक्ष वेधण्यासाठी आलेगावातील पत्रकार श्रीधर लाड, नैय्यर खान, अब्दुल कदीर, रक्षण देशमुख, मो इम्रान, चेतन भुजबळ, अब्दुल जफर व ग्रामस्थानी दिनांक १७ रोजी बस निवऱ्याला पुष्पहार अर्पण करून संबंधित प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. तरी या गंभीर बाबीची वेळीच दखल घेऊन संबंधित प्रशासनाने जीर्ण अवस्थेत असलेल्या बस निवाऱ्याचे बांधकाम करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.



