भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद केंद्रीय शाळा वाडेगाव येथे विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेसीआय इंडिया द्वारा आऊटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द इंडिया अवॉर्ड:-२०२४ चे विजेते,स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष, युवाव्याख्याते प्रा.राजेश पाटिल ताले उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक मा.श्री.समाधान सोर,प्रमुख अतिथी म्हणुन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा हिरळकर ताई तसेच ज्येष्ठ पत्रकार राजकुमार चिंचोलकर,प्रतीक ताले,विकास जाधव,अमोल भटकर,हरिओम राखोंडे, सचिन धनोकर,भूषण ताले,राहुल ताले व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या विचारांचा आपले आयुष्य घडविण्यात मोठा वाटा असतो.त्यामुळे सकारात्मक विचारांनी पुढे जाणाऱ्या व्यक्तीच स्वतः चे यशस्वी आयुष्य घडवू शकतात.विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून विचार व संस्कार रूजविणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी पालक व शिक्षक यांची भूमिका महत्त्वाची आहे असे मार्गदर्शन करतांना प्रा..राजेश पाटिल ताले यांनी सांगितले.प्रा. राजेश पाटिल ताले यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आणि राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय पातळीवर अकोला जिल्ह्याचे नाव उज्जवल केल्याबद्दल शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रा.राजेश पाटिल ताले यांना सन्मानित करण्यात आले.भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद केंद्रीय शाळा वाडेगाव ला नुकताच पीएम श्री चा दर्जा मिळाल्याची माहिती मुख्याध्यापक समाधान सोर यांनी दिली.


