परदेशी, करडे, कुलकर्णी, सावंत, घोडके, क्षीरसागर यांना कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर…
*कळंब….
तालुका पत्रकार संघाचे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, या वर्षी सोलापूर येथील एम.जे.प्रथम मानव सेवा संस्थेला , मुंबई येथील विशाल परदेशी, कळंब येथील शिवाजी सावंत, सुभाष घोडके, आदर्श शिक्षक पुरस्कार ईटकुर जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक अनिल शिरसागर , सुभाष कुलकर्णी, चंद्रकांत करडे,याना जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्काराचे हे 26 वे वर्ष आहे. जानेवारीत मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली.
कळंब तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांची बैठक पत्रकार भवन येथे अशोक शिंदे यांच्या अध्यक्ष ते खाली घेण्यात आली. या वेळी विविध विषयावर चर्चा करण्यात येवून , या वर्षी चे पुरस्कार जाहीर करण्यात आले,या मध्ये..
शि.म.ज्ञानदेव मोहेकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मुंबई येथील विशाल परदेशी,
*स्वा. शिवशंकर बप्पा घोंगडे पत्रकारिता पुरस्कार – चंद्रकांत करडे
स्व.गणेश घोगरे ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार – शिवाजी सावंत कळंब*
स्वा. सै.स्व. शकुंतला देशपांडे समाज सेवा पुरस्कार – मोहन तलकोकुल यांची एम.जे.प्रथम मानव सेवा संस्था सोलापूर,
रा. ई. काकडे शोध पत्रकारिता पुरस्कार – सुभाष कुलकर्णी,
स्व. सुधाकर सावळे साप्ताहिक पत्रकारिता पुरस्कार – सुभाष घोडके सा साक्षी पावन ज्योत कळंब,*स्व.के.ए.जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार ..अनिल क्षीरसागर कळंब, यांना पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी जाहीर केले.जानेवारीत होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.पत्रकार संघाच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.



